उद्या पहाटे साडेतीन वाजता अंतराळातून पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. ९ महिन्यानंतर हे दोघे पृथ्वीवर परतणार आहेत. नासा आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे यान ड्रॅगनमधून हे आंतराळवीर परतणार आहेत. स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग झाले असून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सुनिता विल्यम्स 19 मार्चला पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी पृथ्वीवर पोहोचेल. सुनिता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परत येणार आहेत.