अखेर सुनीता विल्यम्स आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरूप…

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळातील आयएसएस अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आज पृथ्वीवर परतली. तिच्यासोबत तिचा सहकारी बुच विलमोर आणि इतर दोन अंतराळवीर यांना घेऊन येणाऱ्या स्पेसएक्स कंपनीच्या कॅप्सूलने अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात स्प्लॅश डाऊन म्हणजे पॅराशूटच्या सहाय्याने पाण्यात सावकाश उतरण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही प्रक्रिया झाल्यावर, जवळच असलेल्या एका तरंगत्या प्लॅटफॉर्मवर नेऊन ही कॅप्सूल उघडून चारही अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सुनिता विल्यम्ससह चारही अंतराळवीरांनी बाहेर पडताना अभिवादन करून पृथ्वीवर परतण्याचा आपला आनंद व्यक्त केला. अंतराळात इतका जास्त कालावधी घालवल्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतणाऱ्या सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांनी एक नवा इतिहास घडवला आहे.
ML/ML/PGB 19 Mar 2025