बेस्टच्या 4 हजार 500 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित द्यावी
आमदार सुनिल शिंदे यांची मागणी

 बेस्टच्या 4 हजार 500 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित द्यावीआमदार सुनिल शिंदे यांची मागणी

नागपूर, दि १०
बेस्टच्या ४ हजार ५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी थकबाकीमुळे अंधारात गेली असून त्यांना त्वरित थकबाकी द्यावी अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतीकडे हिवाळी अधिवेशनात केली. गेल्या तीन वर्षांपासून ग्रॅच्युईटी आणि रजेचे रोखीकरण यासह लाखो रुपयांची देणी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. ७०० कोटींहून अधिकची ही थकबाकी आहे. विविध प्रयोग करूनही बेस्टच्या परिवहन विभागाचे ना उत्पन्न वाढले, ना तोटा कमी झाला. सन २०१९ मध्ये मुंबई महापालिका, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कामगार संघटनांमध्ये सामंजस्य करार झाला. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यात विविध उपाययोजना होत्या. हा करार संपुष्टात आल्यानंतर नव्याने करार झालाच नाही. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १५० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होऊ लागला. महापालिकेकडून बेस्टला अनुदानापोटी दर महिन्याला काही ठरावीक रक्कम मिळू लागली. मात्र, ही रक्कम खूपच कमी असल्याने ऑगस्ट, २०२२ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्यात अडथळे येऊ लागले. तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा विचार बेस्ट उपक्रमाकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. थकबाकीसाठी बेस्ट उपक्रमातील विविध कामगार संघटनांकडून बेस्ट उपक्रमाकडे वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. ही रक्कम कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यात यावी. तसेच जे कर्मचारी भविष्यात बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना देखील देय असलेली रक्कम तातडीने देण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने बेस्टला द्यावेत अशी मागणी आमदार सुनिल शिंदे यांनी विशेष उल्लेख सुचनेद्वारे या हिवाळी अधिवेशनात मांडली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *