आमदार सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द

 आमदार सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणी त्यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, १२० (बी), ३४ अन्वये दोषी ठरवून त्यांना 5 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच साडेबारा लाख रुपये दंड ठोठवण्यात आला होता .

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यासह इतर पाच जणांना देखील दोषी ठरवण्यात आले होते. बँकेच्या सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या ठेवी बोगस खात्यांमध्ये गुंतवून बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याने सन २००२ मध्ये केदार यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला. त्या निकालाची प्रत पोलिसांनी विधिमंडळ सचिवालयात पाठवली होती त्यावर आज ही कारवाई करण्यात आली.

ML/KA/SL

24 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *