माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

 माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाच आरोपींना पाच वर्षे सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी एकूण 12 लाख 50 हजार रुपये दंड ठोठवण्यात आला. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पुरकर यांनी हा निर्णय दिला.

जिल्हा सहकारी बँकेतील हा बहुचर्चित घोटाळा असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा घोटाळा झाला त्यावेळी सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते.
नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या 2002 साली झालेल्या कोटयवधीच्या घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावताना सदरचा पैसा हा गरिब जनतेच्या मेहनतीचा पैसा आहे. हा भ्रष्टाचार म्हणजे एका मोठ्या कारस्थानाचा भाग असून त्यासाठी नुकसान भरपाई आणि शिक्षा ठोठावण्यात येत आहे असे म्हटले .
सत्र न्यायालयाच्या निकालानंतर सुनील केदार वरिष्ठ न्यायालयात अपील करू शकतात परंतु त्यांना नुकसान भरपाई आधी भरावी लागेल असे सरकारी वकील अजय मिसार यांनी सांगितले.

ML/KA/PGB 22 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *