उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला
मुंबई, दि. १०:- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभार स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS