राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड

 राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड

मुंबई, दि. २६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेसन 2026 आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते तसेच पक्षाचे इतरही काही नेते आणि पदाधिकार उपस्थित होते. यावेळी अधिवेसनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्वच नेत्यांनी एकमताने सहमती दाखवली. आता राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. पक्षाचे कार्यकारी अध्ययक्ष प्रफुल्ल पटेल हेच असतील. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे असेल. सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा चालू होती. परंतु अजितदादांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यात स्वारस्य न दाखवल्याने आता ही चर्चा मागे पडली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *