सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ

 सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई, दि. ३१ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्देवी अपघाती निधनानंतर गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजभवनात एक साध्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्यात सुनेत्रा यांनी “मी सुनेत्रा अजित पवार” असे म्हणत स्वतःची ओळख करून दिली. हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला, ज्यात फक्त प्रमुख नेते उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर विधानसभेत एनसीपीच्या नेत्यांनी “अजित दादा अमर रहें” अशा घोषणा दिल्या, ज्याने वातावरण भावूक झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरला.

सर्वसाधारणपणे मंत्रीपदाची शपथ घेणारे आपले नाव आणि पुढे ‘ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.. अथवा घेते की… असे म्हणतात. पण अजित पवार याला अपवाद होते. ईश्वरसाक्षऐवजी ते गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की असे म्हणायचे. सुनेत्रा पवारांनीदेखील अजित पवार यांच्याप्रमाणेच “मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्क शपथ घेते की..’, असा उल्लेख त्यांनी केला. मी धर्माऐवजी कर्मावर जास्त विश्वास ठेवतो, असे अजित पवार नेहमी म्हणायचे. मी फूले-शाहू-आंबेडकर विचारांचा पाईक आहे आणि जन्मभर राहणार असेदेखील अजित पवार म्हणत असत. अशी विशेषपणे नमूद केले.

सुनेत्रा पवार यांच्या कडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसेच अल्पसंख्य विकास, औकाफ ही खाती देण्यात आली आहेत. दिवंगत अजित पवारांच्या कडे असणारे महत्त्वाचे वित्त खाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः कडे ठेवले आहे

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *