शिवडी येथे सनबर्न’ रद्द करण्यासाठी झाले आंदोलन

 शिवडी येथे सनबर्न’ रद्द करण्यासाठी झाले आंदोलन

मुंबई, दि १८- नेहमीच वादग्रस्त राहिलेला आणि गोवा, पुणे येथून हद्दपार झाल्यानंतर ‘सनबर्न फेस्टिवल’ यावर्षी शिवडी, मुंबई येथे १९ ते २१ डिसेंबरला होणार आहे. या अमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू, अश्लीलता आणि शासनाचा कर बुडवलेला कार्यक्रम यांसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘सनबर्न फेस्टिवल’ तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज शिवड़ी येथे ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने जोरदार जनआंदोलन करण्यात आले.
दादर, वाशी, नेरुळ, वसई आणि विरार येथे गेल्या आठवड्याभरात ‘सनबर्न फेस्टिवल’ विरोधात ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने आंदोलने करण्यात आली आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह महाराष्ट्रात विविध ठिकाणाहून या कार्यक्रमाला विरोध होत असून युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या भूमीत कधीही होता कामा नये, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
अमली पदार्थांच्या वितरणासाठी बदनाम असलेला,मुलांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या, शासनाचा कर बुडवणाऱ्या आणि तरुण पिढीला नशा करायला उद्युक्त करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रशासनाने अनुमती का दिली ? हा प्रश्न या आंदोलनात उपस्थित करण्यात आला असून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीतून, तसेच देशातूनच कायमचा हद्दपार करावा, अशी मागणी ‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’ने केली आहे.
यावेळी, ‘शिवडीवासीय एक बनो | सनबर्न का धिक्कार करो ।।’, ‘सनबर्न तेरी क्या पहचान | नशापान और नशापान ll’, ‘सनबर्न तुने क्या किया | देश का पैसा लूट लिया ||’, ‘युवाओं को जगाना है | सनबर्न को भगाना है ||’, ‘सनबर्न हटवा l मुंबई वाचवा ||’, ‘सनबर्न हटवा–देश वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच आंदोलकांनी ‘सनबर्न’ला विरोध करणारे फलक हातात धरले होते.यावेळी युवक, राष्ट्रप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, समाजसेवक निलेश मानकर आणि इतर मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *