दैत्यसुदन मंदिरात विष्णूच्या मुर्तीला सतत सूर्यकिरणांचा अभिषेक…
बुलडाणा दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे झालेल्या जागतिक दर्जाच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरमुळे वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे, सोबतच या लोणार शहराला अध्यात्मिक महत्त्व देखील आहे, या सरोवर परिसरात अनेक पौराणिक मंदिरे आहेत, या मंदिरांमध्ये वास्तुकलेचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो, तर दैत्यसुदन भगवान विष्णूच्या मंदिरात मूर्तीच्या कपाळी सुर्यकिरणांचा अभिषेक होत आहे, 19 मे पर्यंत हा अभिषेक होणार आहे.
दरवर्षीच 14 मे ते 19 मे दरम्यान सकाळी अकरा वाजता दहा मिनिटांसाठी पाच दिवस हा किरणांचा अभिषेक होत असतो, हा अभिषेक पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहेत.. मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातली गेल्याने हा किरणोत्सव पाच दिवस साजरा होतो.
ML/ML/SL
18 May 2024