गोव्यातील सनबर्न संगीत महोत्सवाला न्यायालयाकडून सशर्त परवानगी

 गोव्यातील सनबर्न संगीत महोत्सवाला न्यायालयाकडून सशर्त परवानगी

पणजी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्थानिक जनतेचा विरोध असूनही २८ ते ३० डिसेंबर या दरम्यान धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त परवानगी दिली. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील धारगळ येथे सनबर्नचे आयोजन करण्यास न्यायालयाने परवानगी देऊ नये ही याचिकाकर्त्याने केलेली मागणी गोवा खंडपीठाने फेटाळून लावली. मात्र खंडपीठाने सनबर्न आयोजकांना काही अटी घातल्या असून, या अटींचे काटेकोरपणे पालन केले जाईल याकडे लक्ष देण्याची सूचना आयोजकांबरोबरच राज्य सरकारला केली आहे.

तीन दिवसीय सनबर्न संगीत महोत्सवाच्या वेळी संबंधित नियम व अटींचे उल्लंघन केले जाणार नाही, याकडे आयोजकांबरोबरच राज्य सरकारनेही लक्ष द्यावे अशी अट मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घातली आहे, असे ॲड.जनरल देविदास पांगम यानी स्पष्ट केले. सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी न देण्याचा ठराव धारगळ येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला पंचायत मंडळाने सनबर्नला तत्त्वत: मान्यता देणारा ठराव मंजूर केला होता. त्याविरोधात याचिकाकर्त्याने गोवा खंडपीठात धाव घेऊन सनबर्नला परवानगी देण्याची मागणी केली होती.
धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यास स्थानिकांचा विरोध असला तरी या प्रश्नावरुन ग्रामस्थांमध्ये फूट पडली असून काही ग्रामस्थांचा या महोत्सवाला विरोध आहे,तर काही ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *