उन्हाळी रानभाजी भोकर
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:
भोकराची कच्ची फळे :१५० – २०० ग्रॅम
लहान आकाराची कैरी – १ (एकदम करकरीत , लोणचे घालायला घेतो तशी घ्यावी)
कांदा – १ (मध्यम आकाराचा)
लसूण – ७-८ पाकळ्या
हिरव्या मिरच्या – २-३
मोहरी, जिरे, हिंग, धणेपूड, जिरेपूड, हळद, मीठ (सगळे चवीनुसार)
गरम मसाला -१ लहान चमचा
फोडणीसाठी तेल
बारीक शेव – मूठभर
क्रमवार पाककृती:
भोकर हे आशियात सर्वत्र आढळणारे झाड आहे. विशिष्ट आकाराच्या बोरांएवढ्या फळांमुळे हे लगेच ओळखता येते. उन्हाळा सुरु झाला कि या झाडाला लहान गोट्यांच्या आकाराच्या गोल फळांचे घोस च्या घोस लगडलेले दिसतात.
भोकरे स्वच्छ धुवून देठे काढून घ्या.
एका मोठ्या पातेल्यात भोकरे बुडतील इतके पाणी घेऊन त्यात किंचित हळद व मीठ घालून उकळायला ठेवा. खूप जास्त शिजू न देता भोकरे जरा नरम झाली कि गॅस बंद करून पाणी काढून टाका .
जरा थंड झाली कि एक एक फळ बोटाने हलकेच दाबून आतील बी व चिकट गर काढून टाका.
बिया काढल्यानंतर २-३ वेळेला पाण्याने धुतले कि सगळा चिकटा निघून जातो.
एकीकडे कैरी किसून घ्या. किसलेल्या गरात जिरे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ टाकून बारीक वाटून घ्या.
कांदा उभा चिरून घ्या.
कढईत फोडणीसाठी तेल तापवून घ्या. तेल कडकडीत तापले कि हिंग मोहरी तड्तडवून घ्या. त्यात चिरलेला कांदा घाला.
कांदा चांगला सोनेरी झाला कि त्यात कैरीचं वाटण घाला. त्यात हळद, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला टाका. खमंग झाले कि भोकरे घाला. नीट मिसळून घ्या. ४-५ मिनिटांनंतर वरून मूठभर बारीक शेव पेरा. नीट परतून झाकण ठेवून एक मिनिट शिजू द्या.
भोकराची भाजी तयार आहे.
Summer Wild Vegetable Bhokar
ML/ML/PGB
15 May 2024