आमची भूमिका सगळ्यांना एकत्र घेऊन जायची
खासदार सुप्रिया सुळे
मुंबई, दि २१
संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यामध्ये इंडिया आघाडी म्हणून दिल्लीतील स्फोट आणि पहलगाम येथील घटनांवर गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
महायुतीतील पक्षांतरावर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, कॅबिनेट आणि वैयक्तिक राजकारण हे वेगळं ठेवलं पाहिजे. तुमची नाराजी असून शकते पण ती निर्णय प्रक्रियेत येता कामा नये. कॅबिनेट मुख्यमंत्री लीड करत असतात. संघटनेच्या अडचणी यावेळी मांडू शकत नाही. महाराष्ट्राने मोठा प्लॅटफॉम दिला आहे. तुम्ही सेवेसाठी निवडुण आला आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी प्रधानसेवक आहे. मग हे त्यांचे विधान महायुती सरकारला लागू होत नाही का? असा सवाल सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष खुप सुसंस्कृत होता. मी त्या पक्षाला खूप जवळून पाहिलं आहे. वेगळ्या विचारांचे असलो तरी त्यांच्यातील काही नेत्यांना आम्ही मानतो. अटलजी यांची पार्टी , सुषमा स्वराज यांना आजही आम्ही नेता मानतो जरी आम्ही वेगळ्या पक्षात आहोत. विरोधक असलो तरी दिलदार आहोत. रोज वेगवेगळी हेडींग असते. ड्रग्स तस्करीच्या लोकांना प्रवेश दिला जातो. आरोप असणाऱ्यांना पक्षाने प्रवेश दिला आहे. आता या पक्षाला काय झालं आहे? नवाब मलिक यांनी काही केलं नाही. खोटे आरोप केले जात आहे. हे ते खूप आधीपासून ते सांगत आहेत. मित्रपक्ष म्हणून चालतात. सोयीप्रमाणे हे त्यांना चालत. काशिनाथ भाऊ गुन्हेगार आहेत की नाही हे भाजप ने सांगाव. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, भाजपचे कोणीतरी बेड नेते आले होते आणि ते म्हणाले होते की अस काम करा की मित्रपक्ष तक्रार घेऊन आले पाहिजे अस असेल तर रवींद्र चव्हाण यांना ट्रॉफी मिळाली पाहिजे. ज्या काँग्रेसवर भाजपने टीका केली. त्याच पक्षाचे लोकांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलं आहे. आश्चर्य वाटतं. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
स्थानिक निवडणुकीवर भाष्य करताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की ,आम्ही पुढच्या आठवड्यात चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्यासोबतदेखील चर्चा करुन निर्णय घेणार आहोत. येत्या 8 दिवसात सगळ चित्र स्पष्ट होईल. आमची भूमिका सगळ्यांना एकत्र घेऊन जायची आहे.असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.
दिल्ली येथे झालेल्या घटनेवर भाष्य करताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, शाळेतील प्राचार्य आणि शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून झालेल्या घटनेची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर शिक्षा करावी. कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळवणुकीसाठी असलेल्या विशाखा समितीप्रमाणेच प्रत्येक शाळेमध्ये अशी यंत्रणा सक्तीची केली पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच चौकशी जाहीर केली असल्याने, या सर्व प्रश्नांची खरी उत्तरे मुख्यमंत्रीच देऊ शकतात. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.KK/ML/MS