भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांची भीषण टक्कर, १ वैमानिक मृत्यूमुखी
भोपाळ,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशमधील मोरेना येथे आज सकाळच्या सुमारास सुखोई-३० आणि मिराज २००० ही दोन विमानं कोसळली. या विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.
दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-३० मध्ये २ वैमानिक आणि मिराज २००० मध्ये एक वैमानिक होता. यातील मिराजमधील वैमिनाकाचा मृत्यू झाला आहे. तर, सुखोई-३० मधील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी आहेत.
या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान या अपघाताचा बाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.
SL/KA/SL
28 Jan. 2023