माजी नगरसेविका सुजाता सानप यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी शिवसेना ऊबाठाच्या फोर्ट येथील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगला येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप ह्यांनी देखील प्रवेश केला. आमच्या पक्षात आमची घुसमट होत होती. तसेच आम्हाला कुठे तरी न्याय मिळत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याची माहिती गणेश सानप यांनी दिली.