संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

 संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. २० फेब्रुवारीला त्यांचे लग्न होणार होते. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *