पोलीस शिपायाची आत्महत्या
![पोलीस शिपायाची आत्महत्या](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2024/04/Suicide-1.jpg)
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : धारावी येथील शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय सर्जेराव साळुंखे (वय 38 )असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. सायन मधील प्रतीक्षा नगर पोलीस वसाहत रूम नं. 408, चौथा मजला, ए विंग,मध्ये विजय साळुंखे यांनी त्यांचे राहते घरामध्ये भिंतीला असलेल्या कडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
विजय साळुंखे सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत होते. ते शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ३० मे पासून पोलीस कॉन्स्टेबल रजेवर होते. मृत विजय साळुंखे यांच्या हाफ पॅन्टच्या डाव्या पॉकेटमध्ये ‘सुसाईड नोट’ मिळालेली आहे. नमूद ‘सुसाईड नोटमध्ये’ साळुंखे यांनी त्यांचे पत्नीचे जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे नमूद केले आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
ML/ML/SL
15 June 2024