पोलीस हवालदाराची आत्महत्या
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भायखळा तुरूंगाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली . या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव असून ताडदेव येथील सशस्त्र विभागात कार्यरत आहे. वारघडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर होती. गुरुवारी रात्री ८.२० वाजता वरगडे यांनी एसएलआरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली.त्यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पोलीस हवालदार वारघडे हे जुनी पोलीस वसाहत हंसराज लेन, भायखळा पोलीस ठाणेच्या बाजूस भायखळा येथे राहत असल्याची माहिती आहे. ते घरी एकटेच रहात होते. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या रहात्या गावी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर नागपाडा पोलीस दाखल झाले. वरगडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या हवालदाराने एवढं टोकाचं पाऊल का उचललं? या संदर्भात नागपाडा
पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ML/KA/PGB
24 Feb. 2023