सुधीरभाऊंसाठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

 सुधीरभाऊंसाठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागले असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

लाडक्या बहिणी धावल्या सुधीरभाऊंच्या सुरक्षेसाठी…

काँग्रेस—भाजपात राडा होण्याचे कारण अगदीच क्षुल्लक होते. सुधीरभाऊ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तलावाच्या कामासंदर्भात मदत करण्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी गावातला सरपंच काँग्रेसचा असल्याने तलावाचे दुरुस्ती काम रखडल्याची तसेच सुधीरभाऊंपर्यंत हा विषय पोहोचू देत नसल्याची तक्रार भाजपाचे कार्यकर्ते सुधीरभाऊंकडे करत होते. प्रचारादरम्यान मुनगंटीवार यांना कोसंबी येथे जाता आले नव्हते. परंतु, प्रचार संपल्यानंतर कोसंबीला भेट दिली असता कार्यकर्त्यांबरोबर बैठकीत हा विषय समोर आला. त्यावेळी अनेक महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र, तेव्हाच मूलवरून काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत त्यांच्या समर्थकांसह तिथे पोहोचले आणि प्रचाराची वेळ संपल्यानंतरही, प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आचार संहितेचा भंग करीत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यासही सुरुवात केली.

त्यावर मुनगंटीवार यांनी त्यांना शांतपणे समजावले की, आपण कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेत असून कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग करत नाही. तसेच, तुम्हाला हवे तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे, पोलिसांकडे तक्रार करू शकता. मी येथून गेल्यानंतर, तुम्हालाही येथे बैठक घेता येईल, माझी काही हरकत नसेल. परंतु, अशा प्रकारे मला जाब विचारण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर, संतोष रावत यांच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अंगावर जात आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा, मुनगंटीवार यांच्या अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांना धक्काबुक्की करणाऱ्यांच्या मध्ये अंगरक्षक आल्याने तिथे मोठा गोंधळ झाला. काही काँग्रेस कार्यकर्ते स्थानिक महिलांच्याही अंगावर धावून गेले. मात्र, सुधीरभाऊंच्या या बहिणींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बेदम चोप देत चांगलाच धडा शिकवला. तसेच, सुधीरभाऊंवर धावून गेलेल्यांनाही या महिलांनी त्यांची जागा दाखवून दिली.

काँग्रेसच्या उलट्या बोंबा…

काँग्रेस उमेदवार संतोष रावत तसेच त्यांच्या समर्थकांनी कायदा हातात घेत स्वतःच निवडणूक आयोग असल्याप्रमाणे दादागिरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे, सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक घटनास्थळी येऊन वस्तुस्थिती जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण हलणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली. अखेर, पोलिस अधीक्षकांनी कोसंबीत येऊन मंत्री सुधीर मुनगंटीवारांची साक्ष नोंदवून घेतल्यानंतरच मुनगंटीवार चंद्रपूरला रवाना झाले.
या राड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने, भाजपा उमेदवार मुनगंटीवारांसह भाजपा कार्यकर्त्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करा, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मूल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पहाटे चारच्या दरम्यान पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांनी मध्यस्थी करत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पांगले.

तक्रारींचे मार्ग सोडून राडेबाजी कशासाठी?

निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला असेल तर, त्यांच्यावर कारवाईचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आयोगाने अशा तक्रारींसाठी एका अॅपची निर्मितीही केली आहे. मुनगंटीवार यांनी आचार संहिता भंग केली होती तर, काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी हाकेवरच्या अंतरावर असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी किंवा पोलिसांत तक्रार का नोंदविली नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आयोगाने अॅपची सोय केली असल्यांने, स्थानिक कोसंबीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही अशी तक्रार करता आली असती. मात्र, मूल ते कोसंबी ५ किमी अंतर जाऊन स्वत: कायदा हातात घेत स्टंटबाजी करण्यामागे संतोष रावतांचा हेतू काय आहे? आधी पोलिसांवर विश्वास नाही असे सांगत आचार संहिता भंगाची तक्रार न नोंदविणारे संतोष रावत राड्यानंतर, पोलिसांकडेच न्याय मागण्यासाठी कसे गेले? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

कोसंबीच्या मुनगंटीवार यांचे बैठकीत महिला मोठ्या प्रमाणावर होत्या. यामुळेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ‘फार काही’ करता आले नाही. कारण या महिलाच आक्रमक झाल्यांचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. ‘कोसंबीच्या लाडक्या बहिणीच मुनगंटीवार यांचेसाठी सुरक्षेची ढाल झाल्याची’ चर्चा आता परिसरात आहे.

ML/ML/PGB 19 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *