सुधीर मुनगंटीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील सिटी माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर पोचून मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारत वेगाने पुढे जात आहे. मतदारांनी या संपूर्ण मतदान प्रक्रियेत आवर्जून मतदान करून या वेगात आपले सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ML/ML/PGB 19 APR 2024