सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींनी केली राज्यसभेवर नियुक्ती

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (8 मार्च) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले- भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित केले आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती हा स्त्रीशक्तीचा सशक्त पुरावा आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.
सुधा मूर्ती या कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील योगदानासाठी ओळखल्या जातात. लेखिका असण्यासोबतच त्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षाही होत्या.सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील हावेरी येथे झाला. त्यांचे वडील आर. एच. कुलकर्णी हे सर्जन होते आणि त्यांची आई विमला कुलकर्णी या शाळेत शिक्षिका होत्या. आई-वडील आणि आजी-आजोबांनी सुधा यांचे संगोपन केले. सुधा मूर्ती यांना दोघांना दोन मुले आहेत – अक्षता मूर्ती आणि रोहन मूर्ती. अक्षता मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. रोहन मूर्ती हे अमेरिकेतील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सोरोकोचे संस्थापक आहेत.
SL/KA/SL
8 March 2024