राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस

 राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस

पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

राज्यातील काही भागांतील वातावरणात मोठा बदल झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरासह, ठाणे , मुंबई भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हडपसर, लोणी काळभोर तसेच पुणे ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावल्याने गुलटेकडी तसेच खडकी येथील भाजी मार्केटमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली.

ML/KA/PGB 1 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *