या अत्याधुनिक युद्धनौकेवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या INS मुरगाव या अत्याधुनिक नवीन युद्धनौकेवरून ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने या युद्धनौकेची रचना केली असून ही जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र वाहक शस्त्रांनी सुसज्ज आहे.
ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरून सोडले जाऊ शकते. मुरगाववर ब्राह्मोसची चाचणी यशस्वी झाल्याने भारतीय नौदलाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
आयएनएस मुरगाव हे स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र विनाशक असून याची ७५ टक्के निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. गोव्यातील मुरगाव शहरावरून या युद्धनौकेला INS मुरगाव हे नाव देण्यात आले आहे. हीची लांबी १६३ मि. तर रुंदी १७ मि. आहे. तर वजन ७४०० टन एवढे आहे. ही भारतीय नौदलातील आत्तापर्यंतची सर्वांधिक शक्तीशाली युद्धनौका आहे.
SL/KA/SL
15 May 2023