भारतात कृत्रिम हृदयाची निर्मिती यशस्वी
कानपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षानिमित्त भारतीय आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. आयआयटी कानपूर येथील संशोधकाना कृत्रिम हृदयाची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. संस्थेच्या 118 व्या स्थापना दिनानिमित्त हे हृदयाचे प्रदर्शन करण्यात आले.
प्रा. अभय करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखाली 10 डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सच्या गटाने या हृदयाची निर्मिती केली आहे. लवकरच या प्राण्यांवर या हृदयाची प्रत्यारोपण चाचणी घेण्यात येईल अशी माहिती अभय करंदीकर यांनी दिली. या चाचण्या दोन वर्ष घेतल्या जातील त्यांनंतर हे कृत्रिम हृदय मानवासाठी वापरण्यास योग्य समजले जाईल.
गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र संसाधनांच्या अभावामुळे त्याप्रमाणात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. या कृत्रिम हृदयाचा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशांतगर्त उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विषयक सुविधांची किफायतशीर उपकरणे तयार करणे या विषयात आयआयटी कानपूरचा हातखंडा आहे. त्यामुळे आता हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतीयांच्या हृदयाची धडधड सकारात्मक रित्या वाढेल एवढे मात्र निश्चित.
SL/KA/SL
1 Jan 2023