श्री गणेश आखाड्याच्या पेहलवानांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

मुंबई, दि. ०७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाण संचलित, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १७ वर्षा आतील मुले मुली यांच्या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या.त्यात भाईंदरच्या युवा पेहलवानानी उत्तम यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आणि मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडाच्या दोन कुस्तीगीरांनी ब्राँज पदकाची कमाई केली आहे. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात पै.ओम सुनील जाधव याने ९२ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदकाची कमाई केली आहे
तर मुलींच्या सतरा वर्षांखालील गटात पै.मनस्वी दिलीप राऊत हिने ६१ कीलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदकाची कमाई केली आहे.
या स्पर्धा श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्य. आणि उच्च माध्यमिक विद्यालय ,मुकिंदपुर, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाल्या.