रिपाइं’ कार्यकर्त्यांची बंडखोरी शमविण्यात यश
मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला (आठवले ) भाजपने एकही जागा न सोडल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, तर काहींनी महायुतीचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.भाजपविरोधातील नाराजी प्रकट करण्यासाठी ५० विधानसभा मतदारसंघात ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.मात्र ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांच्या प्रयत्नाने बंडखोरी करणार कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली असून संपूर्ण राज्यातील 50 रिपाइं कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतली आहे.रिपाइं आठवले गटाला बंडखोरी रोखण्यास यश आल्याचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे यांनी सांगितले.रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे.रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत.महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिले आहे त्यामूळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहन गौतमभाऊ सोनवणे यांनी केले आहे.दरम्यान रिपाइं’चे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थूलकर (नागपूर) यांनी आठवले यांना पत्र लिहून खदखद व्यक्त केली असून आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे.यासंदर्भात गौतमभाऊ सोनवणे म्हणाले की,भूपेश थुलकर हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत.त्यांनी दिलेला राजीनाम पक्षाने फेटाळला आहे.लवकरचं ना.रामदास आठवले निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपूर ला जाणार आहे.त्यावेळी विदर्भातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढणार असल्याचे गौतमभाऊ सोनवणे यांनी सांगितले.