सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक सादर करा, न्यायालयाने फर्मावले

 सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक सादर करा, न्यायालयाने फर्मावले

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने येत्या २५ तारखेला निवडणुकीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने चांगलेच राजकारण तापले होते. या स्थगिती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. सागर देवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आज ( सोमवारी) उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मागील सुनावणीत मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते, तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर सरकारची विनंती मान्य करत न्यायालयाने 9 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी निश्चित केली होती.
मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिनेट निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र त्या काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या. त्यांनतर यावर्षाच्या निवडणुकीचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले. त्यानुसार १० सप्टेंबरला घेण्यात येणाऱ्या निवडणुका अचानक स्थगित करण्यात आल्या.

ML/KA/SL

9 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *