नागपूर लोकसभा, विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज सादर

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. त्यांच्यासोबत काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री सुनील केदार , आमदार अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते उपस्थित होते.
नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौक ते आकाशवाणी चौक पर्यंत रैली काढण्यात आलेली होती.
यावेळी आपला नामाकंन अर्ज सादर करतांना काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सांगितलं की ही लढाई एका हुकूमशाही विचारधारेच्या विरोधात असून आज या रॅलीला स्वैच्छेने कार्यकर्ते आले आहे आणि काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. Submission of nomination form of Nagpur Lok Sabha, Vikas Thackeray
ML/ML/PGB
26 March 2024