खवळलेल्या समुद्रात पर्यटकांची स्टंटबाजी…
सिंधुदुर्ग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे खवळलेल्या मालवण समुद्रकिनारी पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी सुरू असल्याचे दिसून आले आहे.
बिपर जॉय वादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. मालवण समुद्र किनारी देखील मोठं मोठ्या लाटा उसळत असून 13 जून पर्यँत मालवण ते वसईच्या किनार पट्टी भागात 3.5 ते 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या काळात कोणीही समुद्रात प्रवेश करू नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याच खवळलेल्या समुद्रकिनारी पर्यटकांची स्टंटबाजी पहायला मिळत आहे.
प्रशासनाकडून तसेच स्थानिकांकडून समुद्रकिनाऱ्यांपासून दूर रहा अशा सूचना मिळून देखील पर्यटक आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. उसळणाऱ्या लाटांच्या जवळ जाणे , त्यात भिजण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सुरू असून त्यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.Stunts of tourists in rough sea…
ML/KA/PGB
12 Jun 2023