विद्यार्थ्यांकडून पवनेचा प्रदूषणाचा अभ्यास

 विद्यार्थ्यांकडून पवनेचा प्रदूषणाचा अभ्यास

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवना नदी प्रदूषण मुक्तीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी उगमापासून संगमापर्यंत बोटीतून प्रवास करून नदीच्या पाण्याचे ठिकठिकाणचे नमुने गोळा केले होते. त्यांची तपासणी आता अंतिम टप्प्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर कोणत्या ठिकाणी नदी किती प्रदूषित आहे, हे स्पष्ट होणार आहे.
शहराच्या मध्यभागातून पवना नदी वाहते. मामुर्डी-किवळे येथून नदी शहरात प्रवेश करते आणि जुनी सांगवी-दापोडी येथे मुळा नदीला मिळते. मात्र, मावळ व मुळशी तालुक्यातील काही गावांतील व शहरातील सांडपाण्यासह औद्योगिक परिसरातील रसायनमिश्रित सांडपाणीही नदीला मिळते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्यावर पोहोचले आहे. त्यामुळे नदीत जलपर्णी वाढून जलचर वा जलसृष्टी अर्थात जैवविविधता धोक्यात आली आहे.

ती वाचविण्यासाठी व नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध संस्था, संघटना प्रयत्न करत आहेत. त्यात काही महाविद्यालयांचाही समावेश आहे. पवना जलमित्र संस्थेने गेल्या महिन्यात पवना धरणापासून चिंचवड येथील मोरया गोसावी घाटापर्यंत विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व जलमित्र, पर्यावरण प्रेमींनी बोटीतून प्रवास केला होता. त्या दरम्यान नदीकाठच्या प्रत्येक गावाच्या आणि नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या परिसरातून पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित केले होते. यामध्ये पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जेएसपीएमचे अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांनी घेतलेल्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर नदी प्रदूषणाचे प्रमाण स्पष्ट होणार आहे.

Study of wind pollution by students

ML/KA/PGB
22 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *