पत्रकारांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी अभ्यास गट…

 पत्रकारांच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी अभ्यास गट…

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने, परिपक्व धोरण बनवण्यासाठी एका उच्च स्तरीय अभ्यासगटाची स्थापना केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत दिली. या अभ्यासगटात जेष्ठ पत्रकार आणि शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती,त्याला ते उत्तर देत होते. पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं ते म्हणाले.

डिजिटल माध्यमांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता, या डिजिटल माध्यमांसाठी आणि या माध्यमांना सरकारी जाहिराती देण्यासंदर्भात, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या धोरणात बदल केले जातील असं शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं.

ML/KA/SL

25 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *