विद्यार्थांना मोफत मिळणार Gemini AI प्रो’ चा वार्षिक प्लॅन

मुंबई, दि. १७ : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलनं (Google Gemini AI) भारतीय कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक आश्चर्यकारक ऑफर आणली आहे. आता पात्र विद्यार्थींना गुगल AI प्रो प्लॅनचं एक वर्षाचं सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे, ज्याची नियमित किंमत सुमारे 19,500 रुपये आहे. ही ऑफर विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
या ऑफरचं वैशिष्ट्य म्हणजे जेमिनी AI प्रो. हा प्लॅन क्लिष्ट विषय समजून घेण्यास, नोकरीच्या मुलाखतींसाठी तयारी करण्यास आणि नवीन कल्पना सुचवण्यास मदत करते. जेमिनी 2.5 प्रो, गुगलचं आतापर्यंतचं सर्वात सक्षम AI मॉडेल आहे. यामुळे डीप रिसर्चसारख्या प्रगत साधनांचा वापर करून वैयक्तिक संशोधन करता येईल. शिवाय, नोटबुकएलएममध्ये 5 पट जास्त मर्यादा मिळाल्याने अभ्यास (Google Gemini Student Offer) अधिक सोपा होईल. जेमिनी लाइव्ह आणि Veo 3 व्हिडिओ जनरेशन मॉडेलचा वापरही शक्य आहे.
या प्लॅनमध्ये 2TB क्लाउड स्टोरेज देखील आहे, जे गुगल फोटोज, ड्राईव्ह आणि जीमेल यांसारख्या सेवांमध्ये फायदा देईल. यामुळे प्रोजेक्ट्स, नोट्स आणि महत्त्वाच्या फाइल्स सुरक्षित राहतील. तसेच, गुगल वर्कस्पेसमधील जीमेल, डॉक्स आणि शीट्स यांसारख्या अॅप्समध्ये AI क्षमता मिळाल्याने कामगिरी सुधारेल. गृहपाठ, परीक्षेची तयारी आणि लिखाणात मदत मिळणार असल्याने हे प्लॅन विद्यार्थ्यांसाठी खास आहे.
अशी मिळवा ऑफर
या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर “gemini.google/students/?gl=IN” या लिंकवर जा आणि ‘Get offer’ बटणावर क्लिक करा.
त्यानंतर ‘Verify eligibility’ वर टॅप करून तुमच्या शाळा किंवा कॉलेजचं नाव, तपशील आणि संस्थेचा ईमेल अॅड्रेस भरा.
यासाठी वैयक्तिक जीमेल अकाउंट वापरता येईल.
‘Verify student status’ बटणावर क्लिक करून शाळेच्या वेब पोर्टलवर लॉगिन करा आणि आयडी, क्लास शेड्यूल किंवा ट्यूशन पावती अपलोड करा.
गुगल कागदपत्रांची पडताळणी करेल व तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. मात्र, गुगलची ही ऑफर 15 सप्टेंबर 2025 पर्यंतच आहे.