विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, १२ विद्यार्थी रुग्णालयात….
चंद्रपूर, दि २१:–चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधेचा प्रकार उजेडात आलाय. बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल गेली होती. सहल पार पडल्यावर स्थानिक इको पार्क मध्ये भोजन शिजविण्यात आले होते. याच भोजनात चिकन शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात आले. याच चिकनमधून एकूण 52 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
यापैकी 12 विद्यार्थ्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलीस आणि शिक्षण विभागाची पथके शाळेत दाखल झाली असून घटनेचा तपास सुरू आहे.
ML/KA/SL
21 Jan. 2023