विद्यार्थ्यांनी विकसित केले मूकबधिरांची भाषा बोलणारे हातमोजे
![विद्यार्थ्यांनी विकसित केले मूकबधिरांची भाषा बोलणारे हातमोजे](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Image-2023-07-17-at-8.21.29-AM-850x560.jpeg)
ठाणे, दि. १७(एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत.
यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधणे सोपे जाणार आहे, असे या महाविद्यालयाचे डीन प्रा. समिर नानिवडेकर यांनी सांगितले. हा शोध साकेत सप्रे, राज फडतरे, प्रथम पारखे आणि प्रसाद मराठे या ठाणेकर विद्यार्थांनी प्राचार्य डॉ. उत्तम कोळेकर, प्रा. डॉ. संग्राम सावरगावे, प्रा. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य केला.
संपर्क —
प्रा.अमोल शिंदे 97304 12857