एन.डी.स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी विद्यार्थांचा कलाविष्कार

 एन.डी.स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी विद्यार्थांचा कलाविष्कार

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन. डी स्टुडीओ येथे या प्रजासत्ताक दिनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुरू केलेला हा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे.

यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा हलीवलीचे विद्यार्थी ‘शेतकरी नृत्य’ सादर करणार असून आसलपाडा शाळेचे विद्यार्थी ‘पथनाट्य’ सादर करणार आहेत. शारदा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी ‘लेझीम तसेच डंबेल्स’चे सादरीकरण करणार आहेत. कर्जत महिला मंडळ विद्या विकास मंदिराचे विद्यार्थी ‘इतिहास का में’ आणि ‘युनिटी इन डायव्हरसिटी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील हातनोली कातकरवाडी शाळेतील विद्यार्थी ‘आदिवासी नृत्य’ सादर करणार आहेत. या अनोख्या कार्यक्रमात ११३ विद्यार्थी आणि १७ शिक्षकांचा सहभाग असणार आहे.अशी माहिती एन.डी चे स्टूडियो वित्त अधिकारी महेश भांगरे यांनी दिली.

ML/ML/SL

24 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *