दिवसभर संघर्ष आणि आता आंदोलन स्थगित
रत्नागिरी, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असणाऱ्या बारसू सोलगाव परिसरात होणाऱ्या नियोजित ग्रीन रिफायनरी च्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आंदोलनकर्ते आणि पोलिसात दिवसभर संघर्ष झाला आणि सायंकाळी आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचे आंदोलकांनी जाहीर केले.Struggle all day and now suspension of movement
आज सकाळी ज्या ठिकाणी नियोजित तेल शुध्दीकरण प्रकल्पासाठी माती परीक्षण सुरू होते त्या ठिकाणी आंदोलक मोर्चाने पोहोचले , त्यांनी माती परीक्षण थांबवण्यासाठी आक्रमक भूमिका घेत पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला, यावर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना मागे ढकलले , किरकोळ लाठीमार ही केला , काही प्रमाणात अश्रू धुराचा वापर केला.
यामुळे काही काळ संघर्षाचे वातावरण झाले होते. काही आंदोलकांना मार लागला , काही खाली पडले . जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी या ठिकाणी भेट देऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.आधी काम थांबवा आणि मगच चर्चा करू अशी त्यांची मागणी होती.
सायंकाळी आंदोलकांनी एकतर्फी आंदोलन स्थगित करून सरकारने ही काम बंद करण्याची मागणी केली, या दरम्यान चर्चा करू मात्र तरीही काम सुरू राहिले तर मात्र पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल अशी माहिती आंदोलकांनी दिली.
ML/KA/PGB
28 Apr 2023