उद्याच्या मोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी
मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगारी, महागाईसह इतर मुद्द्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे उद्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या महामोर्चाला २ ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात २ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ५ पोलिस उपायुक्त, बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहे.सोबतच या मोर्चात एस आर पी एफ च्या वाढीव तुकड्यांही तैनात करण्यात आल्या आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.
विशेष म्हणजे, या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे .दरम्यान या मोर्चासाठी कडक पोलिस बंदोबस्त असला तरी महाविकास आघाडीकडून नेत्यांना संरक्षणासाठी 150 सुरक्षा रक्षकांची स्वतंत्र टीम तैनात करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी 50 सदस्याची टीम तयार करण्यात आली आहे. उद्या मोर्चा सुरु होण्यापुर्वी आघाडीतील सर्व सदस्य एका ठिकाणी जमतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना सुरक्षा दिली जाईल.
जे. जे. रुग्णालयाजवळून हा मोर्चा निघेल व आझाद मैदानात त्याचा समारोप होणार आहे. या मोरच्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे उद्या आझाद मैदानात कडेकोट पोलीस बंदोबस्त
तैनात करण्यात येणार आहे.
SW/KA/SL
16 Dec. 2022