या पाच सहकारी बँकांवर RBI कडून कठोर कारवाई

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI देशभरातील बँकांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवते आणि ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन अनियमित कारभार करणाऱ्या बँकावर कारवाई करते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नियामक नियमांमधील त्रुटींबद्दल चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या सहकारी बँका म्हणजे राजर्षी शाहू सहकारी बँक लिमिटेड, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड, पाटण सहकारी बँक लिमिटेड आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड होय. याशिवाय आरबीआयने एका सहकारी बँकेचा परवाना पुरसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्यामुळे रद्द केला आहे. मात्र, याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
पुणे येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या राजर्षी शाहू को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर ठेवी खाती ठेवण्यासंबंधीच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सांगितले की राजर्षी शाहू को-ऑपरेटिव्ह बँकेने बचत बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल नियमांनुसार दंड ठोठावला.
याशिवाय आरबीआयने पाटण को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि द प्राइमरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय आरबीआयने द डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक लिमिटेडला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला. बँकेला 7 डिसेंबर 2023 पासून कोणताही बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे. . बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
SL/KA/SL
8 Dec. 2023