कृत्रिम चीज आणि पनीर उत्पादकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात कृत्रिम चीज आणि पनीर तयार करून त्याची विक्री केली जात असून त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भामध्ये शासन तातडीने गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केली होती.
पाचपुते यांनी अशा पद्धतीने बनवण्यात आलेल्या चीज आणि पनीर यांचे नमुनेच थेट अध्यक्षांना सादर केले आणि यात मानवी जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न कसा होत आहे हे विस्तृतपणे सांगितले. यावर पवार यांनी याची तातडीने दखल घेत अन्न आणि औषध प्रशासन विभागा मार्फत असे प्रकार रोखणे आणि ते शोधून काढणे यासाठी जी यंत्रणा लागेल त्याचा त्यासाठीचा आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी पवार यांनी दिली.
केंद्र सरकारशी चर्चा करून यासंदर्भातील नियमही अधिक कडक केले जातील असेही पवार यावेळी म्हणाले. पीओपी मुळे प्रदूषण होत नसल्याची चर्चाराज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . मात्र यामुळे प्रदूषण होत नाही असा दावा करण्यात आला आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन आणि पुरावे आम्ही जमा करीत आहोत अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर दिली. ही लक्षवेधी सूचना चंद्रकांत नवघरे यांनी उपस्थित केली होती त्यावर अनिल पाटील यांनी उपप्रश्न विचारले पीओपीच्या वापराने प्रदूषण होत नसल्याचा दावा आमच्या विभागाने संबंधित लोकांशी घेतलेल्या अनेक बैठकांमध्ये करण्यात आला आहे. त्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी पुढाकार घेत राजीव गांधी विज्ञान, तंत्रज्ञान आयोगाकडे या संदर्भातील अधिक संशोधन आणि त्याबाबतचा अहवाल देण्यास विनंती केली आहे. अशी माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली.
या लक्षवेधी वरील एका उपप्रश्नात वरुण सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्तारूढ सदस्य आक्रमक झाले होते. सरकार कोणाचेही असणे तरी हा प्रश्न मूर्ती उद्योग आणि भावनेचा देखील आहे अशी भावना सत्ताधाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.सांगली जिल्हा बँकेची चौकशीसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विक्री केलेल्या सूतगिरणी संदर्भातील प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि ती चुकीच्या पद्धतीने झाली असेल तर ती विक्री रद्द करण्यात येईल अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भातील एका लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिली.गोपीचंद पडळकर यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. या बँकेच्या वतीने माणगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीचा प्रयत्न केला गेला, मात्र त्याला सध्या स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती देखील भोयर यांनी दिली. या बँकेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने कलम 88 अन्वये केलेला कारवाईला शासनाने स्थगती स्थगिती दिली आहे. त्यावर तातडीने सुनावणी घेऊन ही स्थगिती उठवली जाईल असेही भोयर यांनी यावेळी सांगितलं.