शिमगोत्सवात मढं यात्रा काढण्याची अनोखी परंपरा…

रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील शिमगोत्सव इथे जोपासल्या जाणाऱ्या प्रथा आणि परंपरांमुळे विशेष ठरतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मढ यात्रा काढण्याची अनोखी परंपरा आहे. संपूर्ण कोकणात अशा प्रकारची ही प्रथा फक्त खेड तालुक्यातच जोपासली जाते. गावाला नजर लागू नये आणि येणारे वितुष्ट दूर व्हावे यासाठी ही मढ यात्रा काढली जाते. पूर्वजांपासून ही परंपरा खेडमध्ये चालत आली आहे. यामध्ये मृतदेहाच्या प्रतिकृतीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाते. त्यानंतर त्याचे होळी मध्ये दहन केले जाते. दरम्यान यावेळी ग्रामस्थांकडून फाका म्हणजेच बोंब मारण्याची प्रथा आहे.
ML/ML/SL
15 March 2025