मुंबईत रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना मिळणार प्रशिक्षण

 मुंबईत रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना मिळणार प्रशिक्षण

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संध्याकाळ झाली की, महानगरी मुंबईतील रस्ते आणि गल्ल्यांमध्ये विविध खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉल्सची रेलचेल असते. दिवसभराचा शिण घालवण्यासाठी मुंबईकर आणि मुंबई पहायला आलेले पर्यटक महागड्या हॉटेल्स पेक्षा रस्त्यावरील गाड्यांमधील खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात. मात्र या हे पदार्थ तयार करताना विक्रेत्यांकडून स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाण्याची शक्यता फारच कमी असते. यामुळे काही Lifestyle आजारांनांही आमंत्रण मिळू शकते. या साऱ्यावर उपाय म्हणून मुंबई मनपा आता या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच प्रशिक्षण देणार आहे.

शहरातील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका व भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्यात सोमवार, २३ डिसेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता आणि सज्जता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची माहिती सोबतच प्रभावी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

खाद्यविक्रेत्यांच्या अधिकाधिक सहभागासाठी संसाधने एकत्रित करणे, निवडलेल्या खाद्यविक्रेत्यांना प्रमाणपत्र वितरित करणे आणि प्रशिक्षणासाठी लागणारे इतर मदत पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांसाठी प्रमाणित प्रशिक्षण मॉड्युल, साहित्य आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे व पुरवण्याची जबाबदारी अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाची आहे.

SL/ML/SL

24 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *