सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफानी पाऊस,पूरसदृश्य परिस्थिती, सतर्कतेच्या सूचना

सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे . मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पिठ्ढवळ नदीला ओरोस येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नदीचे पाणी ओरोस ख्रिश्चनवाडीमधील काही घरात घुसले. पुरात फसलेल्या नागरिकाना स्थानिक बचाव पथकाने बोटींद्वारे सूखरुप बाहेर काढले.
जिल्ह्यात अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे . माणगाव येथे बाजारात पाणी घुसले आहे. निर्मला, तेरेखोल, पीठढवळ, भंगसाळ या नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या नद्याकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेरेखोल नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने बाजारात पाणी घुसले आहे. कुडाळ शहरात हॉटेल गुलमोहर कडे भंगसाळ नदीला पूर आला आहे. हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
ML/ML/SL
7 July 2024