मुंबईतील प्रदूषण थांबवा, उच्च न्यायालयाने खडसावले

 मुंबईतील प्रदूषण थांबवा, उच्च न्यायालयाने खडसावले

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या चार दिवसांपासून खालवली आहे. मुंबईतली हवेचा स्तर खालवल्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. चार दिवसांत मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारा, अन्यथा सर्व प्रकल्प बंद करु. नागरिकांच्या जीवापेक्षा विकास कामे महत्वाची नाही? या शब्दांत न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेस खडे बोल सुनावले आहे.

मुंबईत सहा हजार प्रकल्प
मुंबई शहरात सहा हजारापेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प सुरु आहे. तसेच मुंबई मनपाचे अनेक प्रकल्प सुरु आहे. चार दिवसांत हवेची गुणवत्ता सुधारी नाही तर हे सर्व प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा विकास कामे महत्वाची नाही. सर्व सार्वजनिक प्रकल्पाचे काम रोखू, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता राज्यसरकारला ठोस पावले उचलावी लागणार आहे. कारण या आठवड्यात दिवाळीमुळे प्रदूषण वाढण्याचा धोका आहे.

प्रदूषित मुंबईच्या भेटीस येणार केंद्राचे पथक
मुंबईतील हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे साऱ्यांचीच चिंता वाढवली आहे. केंद्र सरकारचे पथक मुंबईतील हवेच्या गुणवत्तेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शहरात दाखल होत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाचे (एमओईएफसीसी) अधिकारी याच आठवड्यात मुंबईत येणार आहेत. Stop pollution in Mumbai, High Court reprimanded

ML/KA/PGB
14 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *