मजबूत जीडीपी डेटामुळे बाजाराने (Stock Market) पाच आठवड्यांची घसरण थांबवली.

 मजबूत जीडीपी डेटामुळे बाजाराने (Stock Market) पाच आठवड्यांची घसरण थांबवली.

मुंबई, दि. 2 (जितेश सावंत): 1 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने पाच आठवड्यांची घसरण थांबवली.संमिश्र जागतिक संकेत, ऑगस्टमधील कमजोर मान्सून आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती,यामुळे निर्देशांक दबावाखाली राहिले परंतू मजबूत जीडीपी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटाने शुक्रवारी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला (India’s gross domestic product (GDP) grew by 7.8 per cent in the April-June quarter of current fiscal (2023-2024), India’s manufacturing PMI rises to a 3-month high of 58.6 in August) आणि निफ्टीने पुन्हा 19,400च्या वर जाण्यात यश मिळवले.

शुक्रवारी अमेरिकन बाजार बढत घेऊन बंद झाले.
सप्टेंबरची सुरुवात तेजीने झाली तर हा जुलैनंतरचा सर्वोत्तम आठवडा ठरला. Dow Jones +115.80अंकांनी वधारला. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 5 सप्टेंबर रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या s&p global services composite pmi india चे आकडे याकडे तसेच जागतिक घडामोडींकडे असेल.

Technical view on nifty

बाजारात गेल्या आठवड्यात सावरताना दिसला. शुक्रवारी निफ्टीने 19435.3 चा बंद भाव दिला.येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 19347-19334 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19310-19249-19201-19189-19076 हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19444-19472-19538-19554-19584-19605-19623 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.
बाजारातील पडझडीचा गुंतवणूकदारानी फायदा उचलावा आणि दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी.

बाजार किरकोळ वाढीसह बंद

सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर, बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली परंतू बाजारात दिवसभर अस्थिरता असल्याने बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला.बाजाराने आपला दोन दिवसांचा विक्रीचा सिलसिला मोडला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 110.09 अंकांनी वधारून 64,996.60 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 40.20अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,306 चा बंद दिला. Sensex, Nifty end flat
बाजाराचा सकारात्मक बंद
मंगळवारी बाजाराची सुरुवात सकारत्मकतेने झाली. परंतु दिवसभर बाजार एका विशिष्ठ पातळीभोवतीच फिरत राहिला. बाजारात अस्थिरता असून देखील बाजाराने सकारात्मक बंद दिला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 79.22 अंकांनी वधारून 65,075.82 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 36.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,342.70 चा बंद दिला. Market ends higher
सलग तिसऱ्या सत्रात बाजार वरच्या स्तरावर बंद
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात गॅप ओपनिंगने झाली. बाजाराने संपूर्ण सत्रात सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे तेजी टिकवली. तथापी, शेवटच्या तासाच्या विक्रीने सर्व इंट्राडे नफा पुसला गेला.

सलग तिसऱ्या सत्रात बाजार वरच्या स्तरावर बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 11.43 अंकांनी वधारून 65,087.25 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 4.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,347.50 चा बंद दिला.Sensex, and Nifty end in the green for 3rd day
तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक
गुरुवारी सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर, बाजाराची सुरुवात वरच्या स्तरावर झाली आणि सुरुवातीच्या तासात नफ्यात वाढ झाली. परंतु सत्राच्या मध्यभागी झालेल्या विक्रीने सर्व नफा खोडून काढला आणि बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

मान्सूनमधील 9 टक्के तुटीच्या चिंतेमुळे बाजारात विक्रीचा जोर वाढला. ऑगस्ट महिन्यात अनेक राज्यांमधील जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 255.84 अंकांनी घसरून 64,831.41 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 93.70 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,253.80 चा बंद दिला Market snaps 3-day winning run

निफ्टी पुन्हा 19,400च्या वर

गेल्या काही दिवसांच्या संथ कामगिरीनंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजाराने शानदार तेजी अनुभवली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 555.75 अंकांनी वधारून 65,387.16 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 181.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,435.30 चा बंद दिला. Nifty reclaims 19,400

( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB
2 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *