फेडरल रिझर्व्हच्या घोषणेपूर्वी बाजारात (Stock Market) अस्थिरता

जितेश सावंत, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजार छोटी बढत घेऊन बंद झाला.रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण(RBI policy),मान्सूनचे उशिराआगमन(late arrival of monsoon), महागाई डेटा (inflation data) आणि पुढीलआठवड्यात फेडरल रिझर्व्हच्या धोरण घोषणेपूर्वी(Federal Reserve’s policy announcement) FII चा कमी झालेला सहभाग.यामुळे बाजारात अस्थिरता जाणवली.

आरबीआयने दरात कोणताही बदल केला नाही परंतु महागाईची लढाई संपली नसल्याचे सांगितले.त्यामुळे आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर बाजारात घसरण झाली.आठवड्याच्या शेवटी प्रॉफिट बुकींगमुळे बाजार घसरला.

मान्सूनच्या उशिरा आगमनाचा फटका कृषिक्षेत्राला होणार असून पर्यायाने अर्थव्यवस्थेला देखील चटके बसतील.
येणाऱ्या आठवड्यात सुद्धा बाजारात चढ
उताराचे(अस्थिरता) प्रमाण राहील. गुंतवणूकदारांचे लक्ष भारताचे १२ जून रोजी जाहीर होणारे CPI आकडे व IIP data तसेच १४ जून रोजी जाहीर होणारे wholesale price index चे आकडे याकडे असेल.

१४ जून रोजी फेडरल रिझर्व्हची पॉलिसी जाहीर होईल
Technical view on nifty-मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे वरच्या स्तरावर निफ्टीने 18782 चा जवळचा स्तर गाठला.
शुक्रवारी निफ्टीने 18563 चा बंद भाव दिला.टेक्निकली बाजार थोडा नरम झाला आहे. निफ्टीसाठी18534-18487-18464-हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 18432-18419-18392-18362-18348-18324 हे स्तर गाठेल. त्याचप्रमाणे वर जाण्याकरिता निफ्टीला 18573-18609-18640-18655-18676-18739 हे टप्पे पार करणे आवश्यक आहे.

मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स 240 अंक वधारला.
मागील सत्रातील तेजीचा सिलसिला पुढे नेत बाजाराने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांगली बढत घेतली. जागतिक बाजारातील सकारात्मकतेचा परिणाम भारतीय बाजारावर सोमवारी झळकताना दिसला. बाजाराने मजबूत नोटवर सुरुवात केली निफ्टीने 18,650 च्या जवळ जाण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या तासांच्या विक्रीने इंट्राडे नफ्यांपैकी काही नफा पुसला गेला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 240.36 अंकांनी वधारून62,787.47 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 59.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,593.80 चा बंद दिला. Sensex climbs 240pts, Nifty ends near 18,600 on firm global cues

बाजाराचा सपाट बंद
अत्यंत अस्थिर अश्या सत्राची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली.आणि जसजसा दिवस पुढे सरकला तसा बाजारावर दबाव वाढला. तथापि, शेवटच्या तासाच्या रिकव्हरीने बाजार फ्लॅट नोटवर बंद होण्यास मदत झाली.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक मंगळवार पासून सुरू झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 5.41 अंकांनी वधारून 62,792.88 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 5.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,599 चा बंद दिला. Sensex ends flat

बाजारात तेजी, सेन्सेक्सने 350 अंकांची उसळी घेतली
बुधवारी बाजाराची सुरुवात घोट्या गॅपने झाली.बरेच तास बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत होता परंतु दुपारनंतर बाजाराने आघाडी घेतली. २०२३ या वर्षात निफ्टीने प्रथमच 18,700 ची पातळी तोडली आणि ते सुद्धा RBI धोरण बैठकीच्या निकाला पूर्वीच्या दिवशी. सलग चौथ्या सत्रात बाजार वधारला, सेन्सेक्स आणि निफ्टी 6 महिन्यांच्या बंद उच्चांकावर पोहोचले.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 350.08 अंकांनी वधारून 63,142.96 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 127.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,726.40 चा बंद दिला. Sensex up 350 pts, Nifty tops 18,700
चार दिवसांच्या तेजीला ब्रेक
गुरुवारी सलग चार दिवसांचा तेजीचा सिलसिला थांबला.

बाजाराची सुरुवात सपाट झाली पण आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर बाजारात घसरण झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने दरात कोणताही बदल केला नाही परंतु महागाईची लढाई संपली नसल्याचे सांगितले. बाजार अर्धा टक्का खाली बंद झाला. बँकिंग समभागांमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजार घसरला.तसेच वाहन, आणि माहिती तंत्रज्ञान समभागांमध्ये सुद्धा जोरदार नफा-वसुली झाली.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 294.32अंकांनी घसरून 62,848.64 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 91.90 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,634.50 चा बंद दिला. Sensex sinks 294 pts as RBI keeps repo rate unchanged.
सेन्सेक्स 223 अंकांनी घसरला.

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. सपाट ते सकारात्मक सुरुवात केल्यानंतर बाजार बराच वेळ ग्रीन टेरिटरी मध्ये राहिला. परंतु दिवसाच्या दूसऱ्या सत्रात नफावसुलीमुळे निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर ओढले गेले. कॅपिटल गुड्स आणि पॉवर वगळता सर्व क्षेत्रांमध्ये विक्री दिसून आली.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 223.01 अंकांनी घसरून 62,625.63 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 71.10 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,563.40 चा बंद दिला. Sensex falls 223 points

(लेखक शेअरबाजारतज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *