विक्रमी स्तरावरून बाजारात (Stock Market) घसरण

जितेश सावंत, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग दुसऱ्या आठवड्यात बाजाराने आपली विक्रमी घोडदौड सुरूच ठेवली.सेन्सेक्सने 65,898.98 व निफ्टीने 19,523.60 ह्या आपल्या आत्तापर्यंतच्या विक्रमी पातळ्या गाठल्या (all time high), FII ची मजबूत गुंतवणूक,मान्सूनची चांगली प्रगती आणि चांगल्या Q1FY24 निकालांच्या अपेक्षेमुळे बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठले.परंतू आठवड्याच्या शेवटी यूएस-चीनमधील वाढता तणाव आणि यूएस फेडच्या आगामी धोरणात व्याजदर वाढीबाबत पुन्हा एकदा शक्यता निर्माण झाल्याच्या भीतीने बाजारावर दबाव राहिला. या आठवड्यात रुपयातील घसरण देखील वाढली रुपया 6 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेला.rupee trades at 6-week low
Global Markets –
शुक्रवारी अमेरिकन बाजारात घसरण दिसून आली तसेच युरोपियन बाजारांमध्ये संमिश्र हालचाल दिसून आली.
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे- बाजाराचे वाढलेले मूल्यांकन (valuation) हा थोडा चिंतेचा विषय असल्याने गुंतवणूकदारांनी वेळोवेळी नफा बुक करावा.
Technical view on nifty-.
बाजाराने गेल्या आठवड्यात नवीन विक्रमी पातळी गाठली.
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हर बॉट झोन (overbought) मध्ये असल्याने आठवड्याच्या शेवटी घसरण वाढली. निफ्टीसाठी 19300 चा स्तर महत्वपूर्ण राहील. हा स्तर तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 19246-19234-19201-19189-19011-18908-हे स्तर गाठू शकते. ह्या आठवड्यात नवीन विक्रमी स्तर गाठण्याची शक्यता कमी आहे.
येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे 12 जुलै रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या Industrial Production, CPI numbers ,जागतिक घडामोडी तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा कल याकडे असेल.
बाजारावर बुल्सची मजबूत पकड
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 3 जुलै रोजी भारतीय शेअर बाजारांनी पुन्हा नवे विक्रम रचले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 65,000 चा टप्पा ओलांडला.व दुसरीकडे, निफ्टी19,300 च्या वर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 65300.35 आणि19345.10 चा इंट्राडे हाय गाठला सलग चौथ्या सत्रात बाजारातील तेजी कायम राहिली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 486.49 अंकांनी वधारून 65,205.05 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 133.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,322.50 चा बंद दिला. Bulls tighten grip
सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्स बहरला.
जागतिक नकारात्मक संकेतांकडे दुर्लक्ष करून बाजाराने पुन्हा विक्रमी झेप घेतली. बाजाराला सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या रोटेशनल खरेदीमुळे बाजार ओव्हर बॉट असून देखील मदत होत आहे. आयटी आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचे समभाग मंगळवारच्या तेजीचे शिल्पकार ठरले.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 274 अंकांनी वधारून 65,479.05 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 66.45 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,389 चा बंद दिला. Sensex zooms for sixth straight day.
बाजारातील तेजी संपुष्टात
कमकुवत आशियाई बाजारांमुळे भारतीय बाजार बुधवारी सपाट उघडले आणि संपूर्ण सत्र एक विशिष्ठ पातळीभोवती
फिरत राहिले.बाजारातील गेल्या पाच सत्रातील वाढीच्या सातत्याला ब्रेक लागला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 33.01 अंकांनी घसरून 65,446.04 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 9.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,398.50 चा बंद दिला. Sensex ends 33 pts down in choppy trade
बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच
गुरुवारी भारतीय बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच राहिली. सेन्सेक्स नवीन उच्चांकावर बंद झाला आणि निफ्टीने 19,500 चा आणखी एक टप्पा ओलांडला. सर्व क्षेत्रांमध्ये झालेल्या खरेदी मुळे बाजाराने नवीन विक्रम केला. कमकुवत सुरुवात करूनही ,सुरुवातीच्या काही तासांतच बाजार सकारात्मक झाला आणि दिवस जसजसा वाढत गेला तसा दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ गेला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 339.60 अंकांनी वधारून 65,785.64 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 98.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,497.30 चा बंद दिला.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात घसरण
आठवड्याचे शेवटचे सत्र भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरले. गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे तेजीला ब्रेक लागला व बाजारात जोरदार घसरण झाली. अमेरिकेतील व्याजदर वाढीबाबत पुन्हा एकदा शक्यता निर्माण झाल्याच्या भीतीने जागतिक बाजारावर दबाव राहिला व त्याचे पडसाद भारतीय बाजारावर दिसले. एफएमसीजी आणि बँकिंग समभागात मोठी घसरण झाली.बाजार सार्वकालिन उच्चांकाच्या खाली घसरला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 505.19 अंकांनी घसरून 65,280.45 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 165.50 अंकांची घेत होऊन निफ्टीने 19,331.80 चा बंद दिला. Sensex sinks 505 pts.
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )
jiteshsawant33@gmail.com