दोन आठवड्याची तेजीची परंपरा खंडीत भांडवली बाजारात (Stock Market)घसरण

 दोन आठवड्याची तेजीची परंपरा खंडीत भांडवली बाजारात (Stock Market)घसरण

मुंबई,दि. 10 (जितेश सावंत) : मागील दोन आठवड्यातील तेजीची परंपरा 9 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात खंडीत झाली. अत्यंत अस्थिर आठवड्यात भारतीय इक्विटी मार्केट 1 टक्कयांनी घसरले.RBI ने वाढवलेले व्याजदर, FII ची विक्री,गुजरातमध्ये भाजपचा व हिमाचल मध्ये काँग्रेसचा विजय,कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण या सगळ्याचा परिणाम बाजारावर होताना दिसला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली.तसेच RBI ने FY23 साठी GDP वाढीचा अंदाज देखील 7% वरून 6.8% पर्यंत कमी केला. बाजाराला येत्या आठवड्यात फेड द्वारे दर वाढीची अपेक्षा आहे.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून भारत,चीन,अमेरिका आणि यू.के चा IIP data , त्याचप्रमाणे भारताचा CPI data त्याचप्रमाणे अमेरिकेतील FOMC बैठक ,ECB rate decision याकडे राहील.
Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीत घसरण होऊन निफ्टी 18552,18484,18445 ह्या स्तरांना स्पर्श केला.तांत्रिकदृष्ट्या निफ्टी कमकुवतपणा जाणवत आहे. तसेच गेल्या काही दिवसात बाजारात मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा कल नफावसुलीकडे जास्त आहे.

निफ्टीने शुक्रवारी 18496 चा बंद दिला आहे. येत्या आठवड्यात जर हा स्तर तुटला.तर निफ्टी 18410-18365-18294-18246 हे स्तर गाठेल जर विक्रीचा जोर वाढला तर निफ्टी 18137-18117-17969 हे स्तर गाठेल वर जाण्याकरिता निफ्टीला 18664-18718 हे स्तर पार करणे आवश्यक राहील.

बाजाराचा सपाट बंद Market ends flat
बाजाराची आठवड्याची सुरुवात नकारात्मक व सपाट नोटवर झाली. परंतु दिवस पुढे सरकताना तोटा वाढला.बाजारात अस्थिरता होती.मेटल, रियल्टी आणि पीएसयू बँकिंग मधील खरेदीमुळे दुपारनंतर बाजार थोडा रिकव्हर झाला. मजबूत नोव्हेंबर सर्व्हिसेस पीएमआय डेटाचा देखील याला हातभार लागला. गुंतवणूकदारांचे लक्ष 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या RBI च्या धोरणात्मक बैठकीच्या निकालाकडे लागल्याने अस्थिरतेत भर पडली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 33 अंकांनी घसरून 62,834.वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 4 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,701चा बंद दिला.

सेन्सेक्स २०८अंकांनी घसरला.Sensex down 208 points

कमकुवत जागतिक संकेतांमुळे मंगळवारी बाजाराची सुरुवात नकारात्मकतेने झाली आणि संपूर्ण सत्रात दबाव राहिला.रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या निकालाच्या एक दिवस अगोदर 6 डिसेंबर रोजी अत्यंत अस्थिर अश्या सत्रात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये विक्रीचा जोर वाढला. गुंतवणूकदारानी आरबीआयच्या आर्थिक धोरणाच्या घोषणेची वाट पाहणे पसंत केले व मार्केट पासून दूर राहणे पसंत केले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 208 अंकांनी घसरून 62,626 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 58 अंकांची घट होऊन निफ्टीने18,642 चा बंद दिला.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ
आर.बी.आय बैठकीपूर्वी बाजाराची सुरुवात सावधपणे झाली. परंतु रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी नंतर बाजारात दबावाचे वातावरण निर्माण होऊन बाजारात घसरण झाली.RBI च्या चलनविषयक धोरण समितीने मुख्य रेपो दर 35 bps ने अपेक्षेनुसार 6.25 टक्क्यांनी वाढवला.गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या कडून भावी काळात व्याजदरात कपातीचे कुठलेही संकेत न मिळाल्याने बाजारात विक्रीचा जोर वाढला व शेवटच्या तासातील विक्रीने निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले. रिझव्‍‌र्ह बँकेने या कॅलेंडर वर्षात सलग पाचव्यांदा व्याजदर वाढवल्यामुळे सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर बाजारावरिल दबाव कायम राहिला. तसेच RBI ने FY23 साठी GDP वाढीचा अंदाज देखील 7% वरून 6.8% पर्यंत कमी केला. बीएसईवर पॉवर, मेटल आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी एक टक्का घसरले. ऑटो, हेल्थकेअर आणि माहिती तंत्रज्ञान निर्देशांक प्रत्येकी 0.5 टक्क्यांनी घसरले. भांडवली वस्तू आणि एफएमसीजी निर्देशांक प्रत्येकी 0.8 टक्क्यांनी वाढले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 215 अंकांनी घसरून 62,410 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 82 अंकांची घट होऊन निफ्टीने18,560 चा बंद दिला.

सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला
गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी संमिश्र जागतिक संकेतांमुळे, बाजाराची सुरुवात सपाट नोटवर झाली परंतु बाजाराने लगेचच दिवसाच्या उच्चांकाला स्पर्श केला व संपूर्ण सत्रात सकारात्मक परंतु सपाट राहिला. बाजारात दुपारनंतर शॉर्ट कव्हरिंग पाहावयास मिळाली. PSU बँकांनी या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी आपली घोडदौड सुरूच ठेवली.PSU बँक निर्देशांक 4% वाढला.सलग चौथ्या सत्रात दबावाखाली राहिल्यानंतर बाजारात थोडी खरेदी झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 160 अंकांनी वधारून 62,570 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 48 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,609चा बंद दिला.

सेन्सेक्स ३८९ अंकांनी घसरला. Sensex falls 389 points
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर राहिला.आश्वासक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली परंतु लगेच सुरुवातीचा नफा पुसला गेला आणि बाजार नकारात्मकडे झुकला.एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजारात पुन्हा एकदा नफावसुली झाली.मुख्यत: प्रमुख IT कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६०० अंकांपेक्षा जास्त घसरला.तथापि, शेवटच्या तासाच्या खरेदीमुळे तोटा कमी होण्यास मदत झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 389 अंकांनी घसरून 62,181 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 112 अंकांची घट होऊन निफ्टीने18,496 चा बंद दिला.

(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com)

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *