सलग सुट्ट्यांमुळे शेअऱ बाजार ३ दिवस बंद

शेअर बाजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत. गुरु नानक जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर शेअर बाजार प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी बंद असतो. म्हणजेच १५, १६ आणि १७ नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस भारतातील शेअर बाजार बंद असेल. म्हणजेच ट्रेडर्स, ब्रोकर्सना आता सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी बँकांना कोणत्या दिवशी सुट्ट्या असतील, याबाबत सांगण्यासाठी एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत 15 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी असेल, असे नमूद आहे.