बाजार (Stock Market) विक्रमी उच्चांकाच्या जवळ

 बाजार (Stock Market) विक्रमी उच्चांकाच्या जवळ

मुंबई, दि. 9 (जितेश सावंत): सकारात्मक देशांतर्गत मॅक्रो डेटा, देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सततची खरेदी आणि आगामी बैठकीत यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर विराम देण्‍याची आशा यामुळे भारतीय बाजाराने सलग दुस-या आठवड्यात मजबूत वाढ नोंदवली.
मान्सूनची घट आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेल्या महागाईच्या चिंतेला गुंतवणूकदारानी या आठवड्यात स्वीकारल्याचे चित्र दिसले.शेवटच्या दिवशी निफ्टीने 19,800 ची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली आणि बाजार 2 महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. परंतु डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडाभरात दबावाखाली राहिला,रुपया 82.94 वर बंद झाला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 8 सप्टेंबर रोजी सांगितले की त्यांनी वाढीव रोख राखीव प्रमाण (I-CRR) टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या घोषणेनंतर बँकिंग क्षेत्रात मोठी तेजी आली आणि बाजाराच्या वाढीकरिता याचा हातभार लागला. Reserve Bank of India (RBI) on September 8 said it has decided to discontinue the incremental cash reserve ratio (I-CRR) in a phased manner
अमेरिकन बाजार शुक्रवारी हलक्या मूजबूतीने बंद झाले. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष भारताचा IIP आणि CPI डेटा तसेच जगातील इतर देशांच्या डेटा कडे असेल.

Technical view on nifty-.

मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार चांगलाच सावरताना दिसला आणि मजबुतीने बंद झाला. शुक्रवारी निफ्टीने 19820 चा बंद भाव दिला.बाजार ओव्हर बॉट झोन मध्ये आहे. येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 19774-19727-19700 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19659-19600-19581-19525 हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19887-19900-19979-19991 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.

सेन्सेक्स 241 अंकांनी वाढला, निफ्टी पुन्हा 19,500 च्या वर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजार वरच्या स्तरावर बंद झाले. सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजाराने सुरुवातीच्या तासांमध्ये सर्व नफा पुसून टाकला आणि नकारात्मक झाला.तथापी दुपारनंतरच्या खरेदीमुळे निर्देशांकांना वाढण्यास मदत झाली आणि दिवसाच्या उच्चांकाच्या जवळबाजार बंद झाला.सर्व क्षेत्रांमध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टीने आरामात 19,500 च्या वर बंद झाला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 240.98 अंकांनी वधारून 65,628.14 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 93.50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,528.80 चा बंद दिला. Sensex ends 241 pts higher, Nifty reclaims 19,500

सलग तिसऱ्या दिवशी बाजार वधारला

मंगळवारी सपाट सुरुवातीस बाजारातील सकारात्मकता हळूहळू वाढत गेली आणि बाजाराने वेग पकडला. मिडकॅप तसेच स्मालकॅप समभागात जोरदार खरेदी दिसून आली.सलग तिसऱ्या दिवशी बाजार वधारला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 152.12 अंकांनी वधारून 65,780.26 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 46.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,574.90 चा बंद दिला. Third straight gain for Sensex

शेवटच्या तासाच्या खरेदीमुळे निफ्टी19,600 च्या वर

सलग चौथ्या दिवशी बाजाराने आपली तेजीची मालिका सुरूच ठेवली. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात सपाट झाली आणि त्यानंतर बाजार सकारात्मक झाला. परंतू काहीच वेळात सर्व नफा पुसून टाकत बाजार नकारात्मक झाला आणि विक्रीचा जोर वाढला.तथापी शेवटच्या तासाच्या खरेदीमुळे निफ्टीला 19,600 च्या वर बंद होण्यास मदत झाली.सेन्सेक्स दिवसाच्या नीचांकी पातळीपासून 483 अंकांनी वाढला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 100.26 अंकांनी वधारून 65,880.52 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 36.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने
19,611चा बंद दिला. Last-hour buying pushes Nifty above 19,600 निफ्टीने 19,700 च्या स्तर पुन्हा गाठला
गुरुवारी कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजार सुरुवातीला कमजोर झाला. मात्र जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतसे यूएस बाँड उत्पन्नात घट आणि कच्च्या तेलाच्या किमतींनी बाजारातील भावना सुधारली. याचा सर्वाधिक परिणाम बँकिंग शेअर्सवर दिसून आला. विशेष म्हणजे, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांचे महागडे मूल्यांकन असूनही गुंतवणूकदारांनी खरेदीकरिता रुची दाखवली.

सलग पाचव्या सत्रात बाजार तेजीत बंद झाला. निफ्टीने महत्त्वाचा 19,700 च्या स्तर पुन्हा गाठला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 385.04 अंकांनी वधारून 66,265.56 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 116अंकांची वाढ होऊन निफ्टीने19,727चा बंद दिला.1 Nifty reclaims 19,700
बाजार 2 महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात चौफेर खरेदीचा मूड दिसला. कमकुवत जागतिक संकेत असूनही, बाजार सकारात्मक उघडला आणि दिवस जसजसा पुढे जात होता तसतसा तेजीचा जोर वाढत गेला. तेल आणि वायू, भांडवली वस्तू, उर्जा आणि रियल्टी समभागातील खरेदीमुळे निफ्टीने 19,800 ची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली.बाजाराने सलग सहाव्या सत्रात विजयी सिलसिला सुरू ठेवला आणि पुन्हा एकदा कमकुवत जागतिक संकेतांना मागे टाकत, दोन महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ बंद दिला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 333.35 अंकांनी वधारून 66,598.91 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 93अंकांची वाढ होऊन निफ्टीने19,820 चा बंद दिला. Market near 2-month high

(लेखक शेअर बाजारतज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
9 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *