बाजार(Stock Market) पाच महिन्यांच्या उच्चांकावर
मुंबई, दि. 27 (जितेश सावंत) : बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत पाच महिन्यांचा उच्चांक गाठला.यूएस कर्ज मर्यादा चर्चा सुरु असल्याने जागतिक बाजारात अस्थिरता असून देखील बाजाराने उच्चांक गाठला.विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पाठिंबा,चांगले तिमाही निकाल तसेचसामान्य मान्सूनची अपेक्षा या जोरावर बाजार वधारला.निफ्टीने 18,500 चा स्तर गाठला.
शुक्रवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले.युरोपीय बाजारातही तेजी दिसून आली. US stocks finished sharply higher on Friday as talks on raising the U.S. debt ceiling progressed
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या GDP व fiscal deficit च्या आकड्यांकडे असेल.
Technical view on nifty-बाजार ओव्हरबॉट झोन मध्ये आहे.शुक्रवारी निफ्टीने 18499चा बंद भाव दिला.वरच्या स्तरावर निफ्टी 18524-18570-18609-18625-18652-18696 हे टप्पे गाठू शकेल पण बाजार ओव्हरबॉट असल्याने वरच्या स्तरावर नफावसुली होईल.निफ्टीसाठी 18333-18314 हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 18295-18268-18212-18203-18180 हे स्तर गाठेल.
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी, निफ्टी 18300 च्या वर
संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली परंतु लगेचच बाजाराने सकारात्मक ट्रेंड पकडला व बाजार संपूर्ण सत्र सकारात्मक राहून बंद होताना दिवसाच्या उचांकच्या जवळ बंद झाला. यूएस कर्ज मर्यादा वाटाघाटींमध्ये संभाव्य प्रगतीच्या अपेक्षेने देशांतर्गत बाजाराने उच्चांक गाठला.तसेच चौथ्या तिमाहीतील कमकुवत कामगिरीमुळे स्वस्त झालेलया आणि कमी मागणी असलेल्या आयटी समभागांची वाढ झाली.त्यामुळे बाजाराच्यावाढीस हातभार लागला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 234अंकांनी वधारून 61,963.68 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 111 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,314.40 चा बंद दिला. IT stocks spark 234-pt rally in Sensex; Nifty tops 18,300
सलग तिसऱ्या सत्रात तेजी
मंगळवारी सकारात्मक सुरुवातीनंतर जसजसा दिवस सरत गेला तसा बाजाराने वेग घेतला.परंतु शेवटच्या तासात विक्रीने बाजार खाली आला व दिवसभराचा सगळं नफा पुसून टाकला परंतु बाजाराने नाममात्र वरती बंद होण्यात यश मिळवले.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 18.11 अंकांनी वधारून 61,981.79 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 33.60 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,348 चा बंद दिला. Sensex, Nifty end flat
सलग तीन दिवसांच्या वाढीला ब्रेक
बुधवारी जागतिक कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला.निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली आणि बाजार संपूर्ण सत्रात दबावाखाली राहिला.दुपारनंतर विक्रीच्या दबावाने बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर ओढले गेले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 208.01अंकांनी घसरून61,773.78वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 62.60 अंकांची घट होऊन निफ्टीने18,285.40 चा बंद दिला. Market snaps 3-day gains
शेवटच्या तासातील खरेदीने बाजारात तेजी परतली
कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात नकारात्मकतेने झाली आणि दिवस पुढे जात असताना तोटा वाढला पण शेवटच्या अर्ध्या तासात झालेल्या ऑटो, एफएमसीजी आणि रियल्टी समभागातील खरेदीमुळे निर्देशांकांना कमबॅक करण्यात मदत झाली.निर्देशांकांनी मागील सत्रातील काही नुकसान भरून काढले आणि सकारात्मक नोटवर बाजार बंद झाला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 98.84 अंकांनी वधारून 61,872.62 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 35.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,321.20 चा बंद दिला. Last-minute buying helps market recover
निफ्टीने गाठला 18,500 चा स्तर , सलग दुसऱ्या दिवशी आणि जून सीरिजच्या पहिल्याच दिवशी बाजाराने धमाकेदार सुरुवात केली. सेन्सेक्सने 600 अंकांपेक्षा जास्त उसळी घेतली.सगळ्या सेक्टर मध्ये झालेली दमदार खरेदी आणि हेवीवेट RIL मधील वाढीने बाजार 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.दिवसभराच्या अखेरीससेन्सेक्स 629.07 अंकांनी वधारून 62,501.69 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 178.10अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,499.30 चा बंद दिला. Nifty ends at 18,500
(लेखकशेअरबाजारतज्ञ,तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
jiteshsawant33@gmail.com
JS/KA/SL
27 May 2023